मुंबई : सध्या मुंबई लोकलमधील प्रवास सर्वसामान्य लोकांसाठी बंद आहे. त्यामुळे यामधून केवळ अत्यावश्यक सेवांशी संबंधित कर्मचारीच यामधून प्रवास करू शकतात. परंतु मुंबई लोकल ही कोट्यावधी लोकांना कमी पैशात, वेळेवर आणि सुखकर प्रवास करण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु तो पर्याय बंद असल्यामुळे लोकांचे जीवन देखील ठप्पं झाले आहे.
मागील वर्षापासून (मधले काही दिवस वगळता) सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नव्हती, यावर्षी देखील लोकल सुरू होण्याचे काही संकेत दिसत नाहीत. कारण कोरोनाची दुसरी लाट संपतेय तोपर्यंत कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परंतु रेल्वे शिवाय कमी खर्चीक आणि वेळ वाचवणारा दुसरा पर्याय सर्वसामान्य लोकांकडे नसल्यामुळे लोकं खोट्या आयडीचा वापर करुन रेल्वेने प्रवास करत आहेत आणि आपण अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी असल्याचे ही लोकांना भासवत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असाल.
या व्हीडिओतील कर्जत येथे राहणार्या प्रेम सरोसेला दोन वर्षानंतर एका कंपनीत नोकरी मिळाली. नोकरी नसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्याच्या बँकेत केवळ चारशे रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत त्याला कामावर तर जावेच लागेल, त्यात त्याला दुसऱ्या मार्गाने प्रवास करने परवडणारे नाही. त्यामुळे त्याने लोकलने प्रवास केला, परंतु त्याला टीसीने पकडले.
ही कथा एका प्रेमची नाही, ही कथा अशा अनेक प्रेमची आहे. ज्यांची कोरोना परिस्थितीमुळे नोकरी गेली आहे आणि असे लोकं मागील 1 वर्षापासून घरीच आहे, त्यांच्याकडे त्यांचे घर चालवण्यासाठी देखील पैसे नाहीत अशा परिस्थितीत लोकांना काही तरी हातपाय चालवावेच लागणार.
पश्चिमेकडील विरारहून चर्चगेटवर मुंबईत पैसे कमावण्यासाठी येणारे प्रवासी 90 ते 100 किलोमीटर प्रवास करतात. त्याचप्रमाणे कसारा येथून सीएसटी स्थानकापर्यंत मध्य रेल्वेचे प्रवासी 120 किलोमीटरहून अधिक प्रवास करतात. आता अंदाज लावा की, ते मुंबई लोकल ट्रेनने आले नाहीत, तर मग त्यांना वाहतुकीच्या दुसऱ्या मार्गाने या ठिकाणी यायला किती वेळ लागेल?
त्यांना कामावर यायला तीन ते चार तास आणि घरी परत जाण्यासाठी तीन ते चार तास लागतील. म्हणजे त्यांचा संपूर्ण दिवस हा प्रवासातच निघून जाईल. अशा लोकंना रेल्वे शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे लोकं सरकारकडे रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची विनंती करत आहेत.
पण सरकारचेही यामागे स्वतःची काही कारणे आहेत. मुंबई हे गर्दीचे शहर आहे आणि गर्दीमुळे कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त वाढण्याची शक्यता असल्यामुळे सरकारही गर्दीतून सुट कशी देऊ शकणार? जर आपण जनतेच्या रोजगाराची चिंता केली तर लोकांचे जीवन संकटात सापडेल असे सरकारचे म्हणणे आहे.
त्यामुळे सध्या मुंबई लोकल सामान्य प्रवाशांसाठी धावणार नाही. तसेच बनावट आयडी घेऊन लोकलमधून फिरणाऱ्या लोकांवर कठीण कारवाई होईल. राज्य सरकारने यासाठी एक नवीन यंत्रणा तयार केली आहे.
त्याअंतर्गत आत्यावशक कर्मचार्यांची यादी तयार केली जाईल आणि ज्यांची नावे त्या यादीमध्ये दिसून येतील, त्यांचा आयडी पाहिल्यानंतर त्यांना लोकलसाठी तिकिटे किंवा पास दिले जातील. या पासला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास म्हटले जात आहे. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की, याक्षणी सामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांवर तोडगा नाही.