Stock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?

Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jun 5, 2024, 10:51 AM IST
Stock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती? title=
stock market today after loksabha result Sensex and nifty latest update

Stock Market Today : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत असतानाच मंगळवारी शेअर मार्केटवर त्याचा मोठा परिणाम झाला. मंगळवाराचा दिवस हा शेअर मार्केटसाठी मोठ्या भूकंपाचा ठरला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 6000 हून अधिक अंकांनी तर वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 501900 अंकांपर्यंत घसरला. पण बाजार बंद होईपर्यंत सुमारे 2000 अंकांची रिकव्हरी झाल्याचा पाहिला मिळाला. अशास्थिती बुधवारी शेअर मार्केटमध्ये काय परिणाम होईल याबद्दल अनेकांना चिंता होती. 

आज एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी हालचार करत आहेत. तरदुसरीकडे आज शेअर मार्केट उघताच सकाळी 9.15 वाजता सेन्सेक्स 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 72,751 वर तर निफ्टी 170.20 अंकांच्या वाढीसह उघडला. 

मंगळवारी शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरल्या पाहिला मिळाला. जसा जसा लोकसभा निवडणुकीचा कल हाती येत होता, तेव्हा दुपारी 12.30 वाजता तो 6094 अंकांनी घसरुन 70 हजार 374 वर पोहोचला. तर निफ्टी 1947 अंकांनी घसरुन 21 हजार 316 वर गेल्याचा पाहिला मिळाला. 

आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात...

भारताचा आर्थिक विकास दर जगात सर्वात वेगवान असल्याचे तज्ज्ञांचे मत असून बाजारात जोरदार पुनरागमन होऊ शकतं असं त्यांच म्हणणं आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना स्वस्त दरात चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी असल्याच तज्ज्ञ म्हणतात. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता, असं त्यांनी सांगितलं. सध्या त्यांनी बाजार स्थिर होण्याची प्रतीक्षा करावी, असं सांगितलंय.

मंगळवारच्या घसरणीचा सर्वाधिक परिणाम सरकारी कंपन्या (पीएसयू) आणि बँकांच्या समभागांवर झाल्याचा पाहिला मिळाला. त्यात 20 ते 23 टक्क्यांची घसरण पाहिला मिळाला. यासोबतच अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांपर्यंत पोहोचला. शेअर बाजारातील या उलथापालथीमुळे गुंतवणूकदारांना 31 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावं लागलं. 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा झाला. 

गेल्या दोन निकालांवरही काय होती स्थिती?

नरेंद्र मोदी सरकार 16 मे 2014 ला सत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्स 261.14 अंकांनी किंवा 0.90 टक्क्यांनी वाढून 24,121.74 वर बंद झाला होता. तर निफ्टी 79.85 अंकांनी किंवा 1.12 टक्क्यांनी वाढून 7,203 अंकांवर पोहोचल्या पाहिला मिळाला. तर 23 मे 2019 ला पुन्हा एकदा मोदी सरकारसत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्स 298.82 अंकांनी किंवा 0.76 टक्क्यांनी घसरून 38,811.39 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 80.85 अंकांच्या किंवा 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 11,657.05 अंकांवर बंद झाला होता.