'शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्यामागे संजय राऊत', कोणी केला हा आरोप?

Sharad Pawar | शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कामगारांनी अचानक धडक दिली होती.

Updated: Apr 9, 2022, 06:40 PM IST
'शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्यामागे संजय राऊत', कोणी केला हा आरोप? title=

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बंगल्यावरील हल्ल्यामागे संजय राऊत (Sanjay Raut) असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. राऊतांवर होत असलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हे केलं असावं, असा दरेकरांचा दावा आहे. नेत्याचं संरक्षण करू शकत नसाल, तर जनतेचं रक्षण कसं करणार असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. हल्लेखोर आंदोलकांना सामोरं जात सुप्रिया सुळेंनी शांततेचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता गृहविभागाकडून सुप्रिया सुळेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोर्टानं सदावर्तेंना जामीन नाकारला. इतर 108 आंदोलकांना देखील कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्री वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त यांच्या सोबतच्या बैठकीत सीएम यांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस यंत्रणेला माहिती कशी मिळाली नाही या विषयी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. याबाबत रिपोर्ट सादर करण्साच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.