शिवसेनेचे दोन तुकडे, मनसेचे वाढणार आकडे? महापालिकेतली गणितं बदलणार?

राज ठाकरेंच्या स्वबळाचा कुणाला होणार फायदा, कुणाला बसणार फटका

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 11, 2022, 07:51 PM IST
शिवसेनेचे दोन तुकडे, मनसेचे वाढणार आकडे? महापालिकेतली गणितं बदलणार? title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेत (Shiv Sena) पडलेली उभी फूट, भाजप-शिंदे युती (BJP-Shinde Alliance) आणि एकाकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अशा सगळ्या बदललेल्या राजकीय समीकरणात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Election) कुणाशीही युती नाही, तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत. 

राज ठाकरे काय म्हणाले?

येणारी निवडणूक स्वबळावर लढायची 

तुमचं पॉझिटीव्ह माईंड असलं पाहिजे

राज्यातलं राजकारण खालच्या थराला जातंय 

महापालिकेत न भूतो असं यश मिळवायचंय

मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत बसवणार 

लोकसेभत सत्तेत खासदार म्हणून बसवणार 

लोकांच्या सुख दुःखामध्ये जा, तुमचा संपर्क असला पाहिजे

आपल्या चिन्हाचे सगळीकडे कंदील लागले पाहिजेत

नाक्यानाक्यावर झेंडे लागले पाहिजेत

पुढचे पाच महिने रात्रभर काम केलं पाहिजे

विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी

राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय, त्याचा नेमका फटका ठाकरे गटाला (Thackeray Group) बसणार, शिंदे गटाला (Shinde Group) बसणार की भाजपला बसणार याची आता चर्चा सुरु झालीय. 2009 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार पडले असा आरोप तेव्हा झाला होता. 

पण आता शिवसेना दोन गटात विभागली गेलीय, शिंदे गटाशी राज यांची जवळीक आहे. असं असतानाही राज यांनी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे राज ठाकरेंच्या स्वबळाचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याची चर्चा सुरू झालीय.