मुंबई : मुंबई मेट्रो 3 आरे कार शेडबाबत सरकारने आणखी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे, ही समिती एक फार्स आहे. एकूण प्रकल्पाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी किंमत ही आरे इथल्या कार शेडची - डेपोची आहे. 8 डब्यांच्या 31 गाड्या या कार डेपोमध्ये रहाणार होत्या, 2031 मध्ये 42 गाड्या राहणार होत्या, 2053 मध्ये आणखी एकूण 55 गाड्या मावतील एवढा कार डेपो हा आरे कार शेडचा आहे. आरेचा कारडेपो हा कांजूरमार्गला नेल्यावर प्रकल्प सुरू व्हायला उशीर होईलच आणि आणखी 5 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
2053 पर्यन्तची सर्व व्यवस्था आरे इथल्या कार शेडमध्ये आहे. कांजूरमार्ग इथे 3 मेट्रो प्रकल्पांची व्यवस्था होणार असं जे सांगितलं जातं आहे ते खोटं आहे. काही अधिकारी पूर्णपणे खोटं बोलून दिशाभूल करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Interaction with media on my letter to Hon CM Uddhav ji Thackeray regarding the urgent need to take immediate steps for Metro CarShed at Aarey.#MumbaiMetro https://t.co/aOBITy42Rd
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2021
सौनिक समितीने अतिशय योग्य रिपोर्ट दिला आहे. मुंबईकरांना मेट्रोपासून वंचीत ठेवण्याचा घाट घातला जात आहे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.