काय सागंता! मुंबई बुडणार? महापूराचाही धोका; धक्कादायक अहवाल समोर

 देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराबद्दल आलेल्या नवीन रिपोर्टमुळे चिंता वाढली आहे. मुंबई शहर दरवर्षी २ मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Updated: Jun 14, 2022, 08:19 AM IST
काय सागंता! मुंबई बुडणार? महापूराचाही धोका; धक्कादायक अहवाल समोर title=

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराबद्दल आलेल्या नवीन रिपोर्टमुळे चिंता वाढली आहे. मुंबई शहर दरवर्षी २ मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.  त्याशिवाय मुंबईत पूरस्थितीचा धोकाही वाढतोय... यामागे भूगर्भीय घटना कारणीभूत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

मुंबईचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, यासंबधी अनेक रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध होत असतात. शास्त्रज्ञ मुंबईच्या भौगोलिक घटकांबाबत बारकाईने अभ्यास करीत असतात. 

जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात मुंबईकरांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. . मुंबई शहर दरवर्षी २ मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत पूरस्थितीचा धोकाही वाढतोय. यामागे भूगर्भीय घटना कारणीभूत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

जगातील ९९ देशांमधील २०१६ ते २०२० या कालावधीतील उपग्रह डेटाचा InSAR पद्धतीने अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय.