'कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा', उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चा

संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

Updated: Jun 13, 2022, 09:42 AM IST
'कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा', उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चा title=

मुंबई : बॉम्बे हाय कोर्टमध्ये दररोज नवनवीन केसेस सुनावणीसाठी फाईल केल्या जातात. काहीजणांना कठोर शिक्षा न्यायमूर्तींना ठोठवावी लागते. तर काही केसेसमध्ये गुन्ह्याचं स्वरूप पाहून त्यानुसार निकाल द्यावे लागतात. संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

मालमत्तेच्या वादात काकाला काठीने मारल्याबद्दल पुतण्याला बॉम्बे हाय कोर्टने नुकतीच शिक्षा सुनावली. आरोपी पुतण्याला  कान धरून पश्चात्ताप व्यक्त करण्यास सांगितले. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एन. जाधव यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. काकाला मारल्याबद्दल पश्चात्ताप करून कान धरा, असा आदेश हाय कोर्टने दिला. 

आरोपीवर कोणते गुन्हे ?

आरोपी जयंती चौहान आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर खंडपीठात सुनावणी झाली. त्याच्या काकांनी भारतीय दंड संहितेच्या 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 324 (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर नोंदविला होता.

अन्यथा तुरुंगात टाकू...

न्यायमूर्ती जाधव यांनी आरोपी चौहान यांना विचारले, “तुमच्या वडिलांना कोणी मारले तर तुम्हाला चांगले वाटेल का?  मग तू तुझ्या काकांना का मारलंस?" त्यानंतर त्यांनी चौहान यांना कान धरून आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करण्यास सांगितले. 

चौहान यांनी हसत हसत न्यायाधीशांच्या आदेशाचे पालन केले. आपण या शिक्षेची पुनरावृत्ती करू शकत नाही अन्यथा तुरुंगात टाकू, असे न्यायमूर्ती जाधव यांनी चौहान यांना सांगितले. सुनावणीनंतर न्यायालयाने एफआयआर रद्द केला.