धक्कादायक! मासे खाताय की किडे? खवय्यांसाठी धोका

तुमच्या ताटात विषारे मासे ?

Updated: Aug 10, 2021, 09:14 AM IST
धक्कादायक! मासे खाताय की किडे? खवय्यांसाठी धोका  title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड : तुम्ही जर पक्के मासे खव्वये असाल तर ही बातमी आवर्जून पाहा. तुमच्या ताटातील मासे विषारी असू शकतात. ऐकायला जरा विचित्र वाटेल. पण हे अगदी खरंय...कारण माशांच्या पोटातून अचानकपणे लाल रंगाचे किडे निघाल्याचं समोर आलंय. त्यामुळे मासे खव्वय्यांसोबत मच्छीमारही धास्तावलेत. 

मासे म्हंटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं...पक्के खव्वये तर चवदार मासे खाण्याची एकही संधी सोडत नाहीत. मासे हा पौष्टीक आहार मानला जातो. पण हाच आहार विषारीही ठरू शकतो..हे दृश्य पाहा...माशाच्या पोटात चक्क लाल किडे आढळून आलेत. मुरबाडच्या बारवी धरणक्षेत्रात सापडलेल्या माशांच्या पोटात असे लाल रंगाचे लांब लांब किडे सापडतायेत. वाम जातीच्या माशाच्या पोटात दो-यासारखे हे किडे आढळून आलेत. 

 प्रश्न लोकांच्या आरोग्याचा असल्यानं काही रहिवशांनी तात्काळ ही बाब मत्स्य विभागाच्या निदर्शना आणून दिली. त्यानंतर अधिका-यांनी तातडीनं बारवी परिसरात धाव घेत या माशांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतलेत. हे मासे खाऊन कुणाला इजा झाल्याचा एखादा प्रकार अद्याप समोर आलेला नाही. मात्र माशांच्या शरीरात किडे आले कुठून? मानवी शरीरासाठी ते अपायकारक आहेत का? असे अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित झालेत. त्यामुळे किमान प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत तरी नदीतले मासे न खाल्लेलेच बरे. 

मासे प्रेमींसाठी अत्यंत धक्कादायक गोष्ट 

मासे खाताय, सावधान 

तुमच्या ताटात विषारे मासे ?

माशांच्या पोटातून निघतायेत लालकिडे