Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

Shivsena Uddhav Thackeray :  ही सभा दसरा मेळाव्याची रंगीत तालीम तर नाही? 

Updated: Sep 21, 2022, 07:58 AM IST
Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर  title=
Shivsena Uddhav Thackeray to address party workers in much awaited meeting

Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याआधीच जाहीर सभा घेणार आहेत. आज (मंगळवारी) गोरेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरची ही पहिलीच जाहीर सभा असल्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार रणनीती आखली आहे असं सध्या स्पष्ट होत आहे. त्यातच अमित शाह यांनी केलेल्या टीकेला ते या सभेतून उत्तर देण्याची शक्यता आहे. 

अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या (Shivaji park Mumbai) शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी सुरू असलेल्या वादावरही उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. सभेदरम्यान आपल्या भाषणातून ठाकरे (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांविषयी नेमकं काय बोलणार की या विषयाला बगल देत इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

वाचा : शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणात दोषी- अतुल भातखळकर

 

(Amit Shah) अमित शाह यांना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडेच सर्वांचं लक्ष? 
मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांच्या या मेळाव्य़ामध्ये अनेकांचं लक्ष असेल. कारण, (Ganeshotsav 2022) गणेशोत्सवाच्या दिवसांदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे शाह यांच्या वक्तव्याला ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

(Mumbai BMC) मुंबई मनपा ठाकरेंचीच? 
मुंबई  (Mumbai) महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे गटासह भाजपनंही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. असं असताना भावनात्मक आवाहन करत मतदारांना आपल्या कलानं घेण्यासाठी उद्धव ठाकरे नेमकं कोणतं तंत्र अवलंबतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यात पक्षाची पुढची वाटचाल काय आणि कशी असेल हेच आजच्या सभेतून स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत.