Narayan Rane | नारायण राणेचं स्मृतीस्थळाचं दर्शन, शिवसेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतींना (Balasaheb Thackeray smriti sthal) वंदन करून जनआशीर्वाद यात्रेची धडाक्यात सुरूवात केली.   

Updated: Aug 19, 2021, 07:05 PM IST
Narayan Rane | नारायण राणेचं स्मृतीस्थळाचं दर्शन, शिवसेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज दुपारी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं (Balasaheb  Thackeray smriti sthal) दर्शन घेतलं. यानंतर आता शिवसैनिकांकडून (Shivsainik) या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण करण्यात येत आहे. गौमुत्र शिंपडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं जातं आहे. (shivsena supporters did purification of balasaheb thackerays memorial after union minister narayan ranes visit) 

दुग्धाभिषेक आणि गौमूत्राद्वारे शुद्धीकरण

राणेंनी स्मृतीस्थळाला वंदन केलं. त्यानंतर आता स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेक तसं गौमूत्राने शुद्धीकरण केलं गेलंय. तसेचं फुलंही वाहिली गेली. आप्पा पाटील यांनी हे शुद्धीकरण केलं. यावेळेस त्यांच्या सोबत शिवसैनिकही उपस्थित होते. आप्पा पाटील हे या स्मृतीस्थळाकडे लक्ष ठेवतात.

जनआशीर्वाद यात्रेला (BJP Jan Ashirwad Yatra)  सुरुवात 

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला (BJP Jan Ashirwad Yatra)  सुरुवात झाली. यावेळेस शिवाजी पार्कवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत नारायण राणे यांनी मुंबई मनपा निवडणूक जिंकण्याचा निर्धार दाखवला. बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून नारायण राणेंनी आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रेची धडाक्यात सुरूवात केली. बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केल्यावर त्यांनी सावरकर स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना वंदन केलं. मुंबई मनपा निवडणूक भाजपच जिंकेल असा निर्धार त्यांनी यावेळी केला.

मात्र आता या सर्व प्रकारामुळे आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात वाद पेटण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता नारायण राणे याबाबत काय म्हणतात, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.