इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, राऊतांचे खुले आव्हान

Sanjay Raut On India Allaince: विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 31, 2023, 11:12 AM IST
इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, राऊतांचे खुले आव्हान  title=

Sanjay Raut On India Allaince: विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे. इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही असे संजय राऊत म्हणाले. इंडिया आघाडीला भाजप घाबरलंय तसेच इंडिया आघाडीची ताकद पाहून चीनही मागे हटेल असेही ते यावेळी म्हणाले. 

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीआधीच खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांनी वर्षावर बैठक घेऊद्या किंवा चांद्रयान 3 खाली बोलवून पुन्हा चंद्रावर जाऊन बैठक घेऊ द्या. आम्ही एक आहोत आणि एक राहणार असे राऊत म्हणाले. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेता आहेत. ते देशात वातावरणनिर्मिती करत आहेत. त्यांच्यावर लोक प्रेम करतात. त्यांच्या नेतृत्वात काम करायचे आहे, असेही यावेळी राऊतांनी सांगितले.

मुंबईत जय्यत तयारी

इंडिया आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयातमध्ये उपस्थित राहतील. ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केलं जाणार आहे. देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आलीय. बैठकीला येणा-या नेत्यांसाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये 170 रुम बुक करण्यात आल्या आहेत. रुम बुकींगची जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आलीय. 

यासोबतच बैठकीतील माहिती माध्यमांना देणे ही जबाबदारी देखील काँग्रेसकडे असणार आहे. राष्ट्रवादीकडे सर्व नेत्यांसाठी गाड्यांचं नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आलीये. तर आज रात्रीचं जेवण ठाकरे गटाकडून दिलं जाणार आहे...या जेवणात मराठमोळे पदार्थ ठेवले जाणार आहेत. तसंच उद्या दुपारचं जेवण काँग्रेसकडून दिलं जाणार आहे.