लोकांच्या मनात चीड आणि संताप, आता ठिणगी पडली आहे, संजय राऊत यांचा इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं मुंबईत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

Updated: Apr 7, 2022, 05:30 PM IST
लोकांच्या  मनात चीड आणि संताप, आता ठिणगी पडली आहे, संजय राऊत यांचा इशारा title=

मुंबई : ईडीच्या (ED) कारवाईनंतर पहिल्यांदाच मुंबईत येत असलेल्या शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं. मुंबई विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात हजारो शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. यानिमित्ताने शिवसेनेनं मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं. 

मुंबईत विमातळावर आल्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार घणाघात केला. हे समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही ही शिवसेना आहे. हा लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे.  महाष्ट्रात भाजपच्या लोकांकडून  INS विक्रांतचा जो घोटाळा झालेला आहे.

त्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या गावपातळीवर शिवसैनिकांचं आंदोलन झालं आहे. आणि तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हल्ले केले जात आहेत. ही नामर्दांगी आहे.  पाठित खंजीर खूपसून राजकारण करण्यासारखं आहे. 

त्या विरुद्ध उसळलेला हा आगडोंब आहे. मला वाटतं ही सुरुवात आहे ठिणगी पडली आहे, यापुढे जसजशी त्यांची पावलं पडतील. त्यानुसार आमची पावलं पडतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.