Coronavirus : वरळी 'डी- कंटेनमेंट' होताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.

Updated: Jun 1, 2020, 09:38 AM IST
Coronavirus : वरळी 'डी- कंटेनमेंट' होताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : संपूर्ण जगासह देशात, राज्यात आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूचीच दहशत पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही गेल्या रुग्णसंख्या वाढीचा वेग मुंबईसारख्या शहरात काहीसा मंदावत असल्यामुळं आरोग्य खातं आणि प्रशासनाला एक दिलासा मिळाला आहे. त्यातच मुंबईतील पहिला कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आलेल्या वरळी भागातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेले काही निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. 

वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. पण, तरीही या भागातील नागरिकांचं सहकार्य, प्रशासनाचे अथक परिश्रम या साऱ्याच्या बळावर संकटावर नियंत्रण ठेवणं शक्य झाल्याची दिसादायक प्रतिक्रिया वरळी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

'हा पहिला कंटेनमेंट झोन असल्याने कंटेनमेंट झोनच्या व्यावहारिक अडचणींबद्दल आपण पहिल्यांदाच अनुभवत असलेल्या समस्यांचा सामना केला. इतर भागांमध्ये कोविडशी लढण्यासाठी हे एक मॉडेल ठरले. तेथील रहिवाशांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे वरळी कोळीवाडा, जिथे सर्वप्रथम जास्त रुग्ण सापडले होते आणि कंटेनमेंट झोन बनविला गेला होता तिथे आता डी-कंटेनमेंट करण्यात आले आहे. केवळ अॅक्टिव्ह रुग्ण असलेले ठिकाणे सील केली आहेत', असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं. 

 

रेशन कार्डपासून गॅस सिलेंडरपर्यंतच्या नियमांमध्ये आजपासून 'हे' मोठे बदल

 

जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळासाठी अनेक निर्बंध असणाऱ्या या भागात आता सर्वसामान्यांचं आयुष्य काहीसं रुळावर येताना दिसणार आहे. मुळात वरळीचा आदर्श आता इतर भागांतील नागरिकांनी घेत त्या अनुशंगानं प्रसासनं आणि आरोग्य खात्याला सहकार्य केल्यास शहरातील कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या प्रमाणात यश येऊ शकतं असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.