शिवसेनेला धक्का : हाजी अराफात शेख यांचा भाजपात प्रवेश

भाजपाने सेनेवर धक्कातंत्राचे अवलंब करायला सुरूवात केलीयं.

Updated: Sep 2, 2018, 06:13 PM IST
शिवसेनेला धक्का :  हाजी अराफात शेख यांचा भाजपात प्रवेश  title=

मुंबई : शिवसेनेचे उपनेते हाजी अराफात शेख यांचा नाट्यमयरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. नुकतीच महामंडळ नियुक्त्यांमध्ये राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलीय. मात्र ही नियुक्ती भाजपकडून होती अशी माहीती आता समोर येते.

पक्षप्रमुखांकडे लॉबिंग  

हाजी अराफत शेख हे शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून अराफत शेख यांची आयोगाच्या उपाध्यक्ष पदासाठी पक्षात उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग सुरु होती. 

भाजपाचे धक्कातंत्र 

उपनेते हाजी अराफात शेख यांच्या भाजपा प्रवेशाने शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. यावर अद्याप कोणत्याही शिवसेना नेत्याची प्रतिक्रीया आली नाही. पण आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाने सेनेवर धक्कातंत्राचे अवलंब करायला सुरूवात केल्याचे यातून दिसून येत आहे.