ठाकरेंचा वजीर शिंदे गटात? दसरा मेळाव्यात शिंदे गट करणार मोठा धमाका?

ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत शिंदे गटात का जातायत? ठाकरेंची सावलीच ठाकरेंना धोका देणार?

Updated: Oct 1, 2022, 07:02 PM IST
ठाकरेंचा वजीर शिंदे गटात? दसरा मेळाव्यात शिंदे गट करणार मोठा धमाका? title=

Thackeray Group vs Shinde Group : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सावली, राईट हँड किंवा वजीर म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं ते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचं. पण तेच मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात (Shinde Group) सामील होतायत अशी चर्चा आहे. शिंदेंचे खास गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) नार्वेकरांबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय, त्यामुळे ठाकरे-नार्वेकरांमध्ये खरंच दुरावा निर्माण झालाय का, नार्वेकरांची निष्ठा ठाकरेंशी की शिंदेंशी अशी चर्चा सुरु झालीय.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना (Shivsena) सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर 15 पैकी पाचही आमदार ठाकरेंकडे शिल्लक राहणार नसल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला आहे. शिवसेना ही आमची आहे, बाळासाहेब ठाकरे हे कोणाची एकट्याची मालमत्ता नाही. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही महाराष्ट्रात काम करत आहोत, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

ज्या चौकडीमुळे उद्धव ठाकरेंशी थेट बोलणं अशक्य होतं, असा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी आजपर्यंत केलाय, त्याच चौकडीत मिलिंद नार्वेकरांचा समावेश होतो. 

कोण आहेत मिलिंद नार्वेकर? 

उद्धव ठाकरेंचे राइट हँड अशी ख्याती 

शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून सुरुवात

28 वर्ष नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव म्हणून काम

ठाकरेंची वेळ देणं, नेते-कार्यकर्त्यांचं फोन घेणं, दौरे आखणं ही जबाबदारी

ठाकरे कार्यकारी प्रमुख झाले तसं नार्वेकरांचं वजन वाढलं

सध्या मिलिंद नार्वेकर ठाकरेंसोबत कमी दिसतायत. त्यांची जागा रवी म्हात्रेंनी (Ravi Mhatre) घेतली अशीही चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकर नाराज आहेत असंही बोललं जातंय. 

काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणाऱ्या चंपासिंह थापा (Chmapasingh Thapa) यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आता ठाकरेंची सावली. त्यांचा वजीर अशी ओळख असणारे मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत शिंदे गटात का जातायत अशी चर्चा आहे.