उद्धव ठाकरे करणार अयोध्यावारी, मंदिर निर्माणाबाबत चर्चा

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या वारीच्या भेटीची तारीख जाहीर करणार आहेत. 

Updated: Oct 4, 2018, 10:01 AM IST
उद्धव ठाकरे करणार अयोध्यावारी, मंदिर निर्माणाबाबत चर्चा title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्यावारी करणार आहेत. यावेळी ते रामजन्मभूमीलाही भेट देणार असून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या वारीच्या भेटीची तारीख जाहीर करणार आहेत.

मंदिर निर्माणाबाबत चर्चा

रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन  त्यांना अयोध्याभेटीचं निमंत्रण दिलं. उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मंदिर निर्माणाबाबत चर्चा होणार आणि सर्वसहमतीनं निश्चित कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या मदतीशिवाय राममंदिर निर्माण होऊ शकत नसल्याचं जन्मेजयशरणजी महाराज यांनी सांगितलं.

अयोध्या हा शिवसेनेचा गड असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.