कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. ठाकरे गटाला (Thackeray Group) नाशिकमध्ये (Nashik) मोठं खिंडार पडणार आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी (Shiv Sena Ubt) हा आणखी एक धक्का आहे. (shiv sena ubt group 15 to 17 ex corporators of nashik join balasahebanchi shiv sena in presence of cm eknath shinde at mumbai)
ठाकरे गटाचे 15 ते 17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे. पक्षप्रवेशासाठी सर्व नगरसेवक हे वर्षावर दाखल झाले आहेत.
दरम्यान शिवसेना कुणाची या प्रश्नावरची सुनावणी यावर्षी होणार नाही. तर ती सुनावणी पुढच्या वर्षी जानेवारीत होणार आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाला लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टानं त्याला नकार दिला. या प्रकरणात पुढील सुनावणी 13 जानेवारीला होईल असं कोर्टानं सांगितलं. 13 जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रकासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुख्य सुनावणीला कधी सुरुवात होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
तसेच धनुष्यबाण चिन्हाची (Symbol) सुनावणीही नव्या वर्षातच होणार आहे. धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात 12 डिसेंबरला सुनावणी झाली. हे कामकाज अवघ्या 5 ते 7 मिनिटांत संपलं. ठाकरे आणि शिंदे गट यांना या दोन्ही गटांच्या वकिलांनी 12 डिसेंबरला युक्तीवाद केला नाही. आता या प्रकरणाची सुनावणी पुढच्या वर्षी 10 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, या तारीख पे तारीख वरून ठाकरे आणि शिंदे गटात वार-प्रहार सुरू झालेत.