Loksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?

Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.

नेहा चौधरी | Updated: Mar 25, 2024, 01:14 PM IST
Loksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट? title=
Shiv Sena Thackeray Group Candidates Loksabha Election 2024 will be announced from Samana tomorrow 26 March 2024

Sanjay Raut on Mahavikas Aaghadi Seat Sharing Formula : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं अखेर ठरलंय. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार झाली आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना मात्र उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 

ठाकरे गटाच्या या जागांसाठी शिलेदारांची यादी तयार!

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना म्हणजे ठाकरे गट 20 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 16 अशा जागा लढविणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशातच उद्धव ठाकरेंची पहिली यादी तयार झाली असून ती उद्या सामनातून जाहीर करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय की, शिवसेना गटाची पहिली यादी जी 15 ते 16 जागांसाठी आहे त्यासाठी उमेदवार निश्चित झाली आहेत.

शरद पवारांना यादी दाखवणार

आज मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लोकसभा निवडणूक 2024 साठी जागेवाटपावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. शिवसेना आपल्या पहिल्या यादीत रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या वाद नसलेल्या मतदारसंघांतील उमेदवार घोषणा करु शकते.

संजय राऊत काय म्हणाले पाहा व्हिडीओ

त्याशिवाय कायम गाजणारे छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण, मुंबई, सांगली आणि मावळ या जागांचाही यात समावेश असू शकतो. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी कोणाला संधी दिली आहे उद्याच्या सामनामधून कळणार आहे. 

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार

1)    दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2)    दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
3)    उत्तर पूर्व मुंबई – संजय पाटील
4)    उत्तर पश्चि मुंबई – अमोल किर्तीकर
5)    उत्तर मुंबई – तेजस्वी घोसाळकर / विनोद घोसाळकर
6)    ठाणे – राजन विचारे
7)    कल्याण – केदार दिघे
8)    पालघर – भारती कामडी किंवा सुधीर ओझरे
9)    रायगड -  अनंत गिते
10)    रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
11)    मावळ – संजोग वाघिरे पाटील
12)    सांगली – चंद्रहार पाटील
13)    नाशिक – विजय करंजकर 
14)    संभाजीनगर – चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे
15)    परभणी – संजय जाधव
16)    हिंगोली – नागेश आष्टीकर
17)    धाराशिव – ओमप्रकाश राजेनिंबाळकर
18)    बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
19)    यवतमाळ वाशिम – संजय देशमुख

20)    शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
21)    जळगाव – ललिता पाटील किंवा हर्षल माने
22)    हातकणंगले – राजू शेट्टींना पाठिंबा