Sheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Updated: Mar 13, 2023, 06:07 PM IST
Sheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात title=

Sheetal Mhatre Video : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mahtre) यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ (Morphing Video) प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) साईनाथ दुर्गे (Sainath Durge) याला ताब्यात घेतलं आहे. साईनाथ दुर्गे हा आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसंच तो सघ्या युवासेना कार्यकारिणीची सदस्य आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विमानतळावरुन साईनाथ दुर्गेला ताब्यात घेतलं.

काय आहे नेमकं प्रकरण?
मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे (prakash surve) आणि  शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवारी श्रीकृष्ण नगर या ठिकाणी नदीवरील पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे हे देखील होते.  त्यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ठाकरे गटाने (Thackeray Group) चुकीच्या पद्धतीने तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर संतापलेल्या शीतल म्हात्रे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाणे (dahisar police) गाठत तक्रार दाखल केली.

शीतल म्हात्रेंचा आरोप
राजकारणात महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले, तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?", असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला आहे. 

विधानसभेतही मुद्दा उपस्थित
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या (Sheetal Mhatre) मॉर्फिंग केलेल्या व्हायरल क्लिपचा (Viral Video Clip) मुद्दा आज विधानसभेतही गाजला. एका महिलेला मॉर्फिंग क्लिपवर (Morphing) किती खुलासे करावे लागणार असा सवाल शिवसेना आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी विचारला. तर संध्याकाळपर्यंत ही मॉर्फिंग क्लिप सोशल मीडियात (Social Media) फिरवणारा मास्टरमाईंड (MasterMind) शोधून काढा अशी मागणी भाजप आमदार मनिषा चौधरींनी (Manisha Choudhari) केली.