Latest IPO News: पैसे तयार ठेवा! 'सेबी'कडून 'या' 4 कंपन्यांना IPO साठी हिरवा कंदील

Share Market Latest IPO News: आयपीओच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार असेल तर तुम्ही सध्या पैसे तयार ठेवले पाहिजे. यामागील कारण म्हणजे सेबीने चार कंपन्यांच्या आयपीओसाठी परवानगी दिली आहे. या कंपन्या कोणत्या आणि त्या करतात पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2024, 08:57 AM IST
Latest IPO News: पैसे तयार ठेवा! 'सेबी'कडून 'या' 4 कंपन्यांना IPO साठी हिरवा कंदील title=
चार कंपन्यांना सेबीकडून परवानगी

Share Market Latest IPO News: तुम्ही आयपीओच्या माध्यमातून शेअर्समध्ये गुंतवणूक करुन नफा कमवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी लवकरच नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. देशातील मार्केट नियंत्रक असलेल्या सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सीबीने 4 कंपन्यांना आयपीओसाठी परवानगी दिली आहे. हे 4 आयपीओ नेमके कोणत्या कंपन्यांचे आहेत आणि या कंपन्या काय काम करतात ते जाणून घेऊयात...

कोणत्या आहेत या 4 कंपन्या?

सेबीने ज्या 4 कंपन्यांना परवाणगी दिली आहे त्यामध्ये आर्केड डेवलपर्स, सीजे डार्कल लॉजिस्टिक्स, जुनिपर हॉटेल्स आणि इंडो फार्म इक्विपमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. सीजे डार्कल लॉसिस्टिक्स कंपनीला 31 जानेवारी रोजी ऑबझर्वेशन लेटर 'सेबी'ने दिलं. त्यापूर्वी म्हणजे 24 जानेवारी रोजी 'इंडो फार्म इक्विपमेंट'ला 'सेबी'कडून ऑबझर्वेशन लेटर देण्यात आलं. हयात नावाखाली हॉटेल्सची चैन चालवणाऱ्या जुनिपर हॉटेल्सच्या आयपीओसाठी 'सेबी'ने 29 जानेवारी रोजी ऑबझर्वेशन लेटर दिलं. या सर्व कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 दरम्यान आयपीओसाठी 'सेबी'कडे अर्ज केले होते. हे अर्ज आता मान्य करण्यात आले आहेत.

जुनिपर हॉटेल्स

मुंबईमध्ये हयात ब्रॅण्ड नावाखाली हॉटेल चालवणाऱ्या जुनिपर हॉटेल्स कंपनीने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सेबीकडे ड्राफ्ट पेपर दिला होता. आयपीओमधून कंपनीला 1800 कोटींचा निधी उभारायचा आहे.

सीजे डार्कल लॉजिस्टिक्स

गुरुग्राममधील या लॉजिस्टिक्स कंपनीने मागील वर्षी 27 सप्टेंबर रोजी 'सेबी'कडे ड्राफ्ट पेपर दाखल केला होता. आयपीओच्या माध्यमातून 340 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहे. 54.31 लाख इक्विटी शेअर्सची विक्री ओएफएसच्या माध्यमातून होणार आहे.

इंडो फार्म इक्विपमेंट

चंढीगडमधील कृषी उपकरणे बनवणारी ही कंपनी 1.4 कोटी इक्विटी शेअर्स सार्वजनिक माध्यमातून विकणार आहे. यापैकी 1.05 कोटींचे इक्विटी शेअर्स नव्याने जारी केले जाणार आहेत. प्रमोटर रबीर सिंह खडवालिया यांच्याकडील 35 लाख इक्विटी शेअर्स ओएसएफमध्ये आहेत.

आर्केड डेवलपर्स

आर्केड डेवलपर्स ही मुंबईतील रिअल इस्टेट कंपनी आहे. आयपीओच्या माध्यमातून 430 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं कंपनीचं उद्देश आहे. कंपनीने 31 ऑगस्ट रोजी सेबीकडे ड्राफ्ट पेपर पाठवला होता.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)