मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया १२ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी शरद पवार ११ एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट होणार आहेत. याआधी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पित्ताशयातील खड्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते
डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आता पवार ११ एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत असून १२ एप्रिल रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी 7 एप्रिलला कोविड-१९ (COVID-19) लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. आज सकाळी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतला असे ट्वीट शरद पवार यांनी केले.
डॉ. तात्याराव लहाने (Dr.Tatyarao Lahane) आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार असेही ते ट्वीटमध्ये पुढे म्हणाले.