उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले!

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 7, 2017, 04:50 PM IST
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले! title=

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या भेटीमुळे शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही. त्याचेवळी पवार यांनी तुम्ही तुमची भूमिका घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येणार आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे.

तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहाण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आलेय.