'शाहरुखने 41 वर्ष मन्नत बंगल्याचं भाडेच दिलं नाही' माजी आमदाराचा गंभीर आरोप

'शाहरुखचा मन्नत बंगला सरकारी जमिनीवर उभा असून याचे पुरावे देणार'

Updated: Jun 20, 2022, 07:27 PM IST
'शाहरुखने 41 वर्ष मन्नत बंगल्याचं भाडेच दिलं नाही' माजी आमदाराचा गंभीर आरोप title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुंबईतला मन्नत (Mannat) बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहरुखचा मन्नत बंगला सरकारी जमिनीवर उभा असून त्याचा करार 1981 मध्ये संपला आहे असा गंभीर आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांनी केला आहे. 

महाराष्ट्र राज्यात भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असताना शेकडो एकर सरकारी जमीन ही अत्यल्प दराने भाड्याने देण्यात आलेली आहे. पण जमीनींचं भाडं घेणं बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट वाढलेला आहे. हे सर्व पैसे वसूल केले तर जे कोणी करायला तयार नाहीए, तर महाराष्ट्र टॅक्स फ्री होऊ शकतो, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. 

या सर्व जमिनींमध्ये एक भाडेकरु ज्याचं नाव आहे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा मन्नत बंगला हा सरकारी जमिनीवर उभा आहे. याचा करार 1981 मध्ये संपला आहे. पण 1981 पासून आज 2022 पर्यंत हा करार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अजूनही पुर्नस्थापित केलेला नाही. याचे पुरावे आपण उद्या देणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.