राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, पण डॉक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

राज ठाकरे यांच्यावर दीड तास शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी सांगितलं पुढचे दोन ते तीन महिने... 

Updated: Jun 20, 2022, 06:38 PM IST
राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, पण डॉक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला  title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.  दीड तास ही शस्त्रक्रिया पार पडली. ऑपरेशन दरम्यान राज ठाकरे यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता 4 ते 5 दिवस रुग्णालयात उपचार सुरु राहणार असून त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती डॉ. जलील पारकर आणि डॉ विनोद अग्रवाल यांनी दिली.

त्यांना फिजिओथेरपी दिली जाणार असन डिस्चार्ज दिल्यानंतर घरीसुद्धा त्यांच्यावर उपचार सुरु राहतील. पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तोपर्यंत त्यांना कोणीही सभा किंवा मिटिंग करता येणार नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दोन ते तीन महिन्यांतर ते पूर्णपणे बरे होतील राज ठाकरे यांच्या चाहत्यांनी काळजी करु नये असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

राज ठाकरे 18 जूनला मुंबईतल्या लिलावती रुग्णलायत दाखल झाले होते, आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. याआधी एक जूनला शस्त्रक्रिया होणार होती. पण राज ठाकरे यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत
टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं बळावल्याने मे महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी नियोजित अयोध्या दौराही स्थगित केल्याचं जाहीर केलं होतं. येत्या 5 जूनला राज ठाकरे आणि मनसे पदाधिकारी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.