कोरोनात सर्वांना वृद्धांची काळजी घेणे आवश्यक

कोरोनाविषयी सर्वात जास्त भीती ही वयस्कर लोकांनी घेतली आहे. शहरातील अनेक वयस्कर लोकांनी घराबाहेर पडणं

Updated: Mar 13, 2020, 10:33 PM IST
कोरोनात सर्वांना वृद्धांची काळजी घेणे आवश्यक title=

मुंबई : कोरोनाविषयी सर्वात जास्त भीती ही वयस्कर लोकांनी घेतली आहे. शहरातील अनेक वयस्कर लोकांनी घराबाहेर पडणं टाळायला सुरूवात केली आहे. वयोवृद्ध लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगितलं जात असल्याने, या वयोगटाने धास्ती घेतलीय. पण तरूणांना याचा जास्त धोका नाही असं म्हणत तरूणांनी वयोवृद्धांची जरूर काळजी आणि जबाबदारी घेतली पाहिजे.

कारण आजही अनेक ठिकाणी म्हातारे आईवडील एकटेच घरी आहेत, मुलं नोकरीसाठी कुठेतरी लांब आहेत. त्यावेळी अशा धास्तावलेल्या लोकांसाठी मदतीचा हात नक्कीच पुढे केला पाहिजे.

तरूणांना या फारसा फटका बसणार नाही, असं म्हटल्यावर तरूणांनी आपली सुटका करून घेतली असली. तरी घरातील आणि शेजारच्या वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्या वयस्कर व्यक्तींना श्वसनाचा, तसेच हृदयाचा, रक्तदाबाचा त्रास असेल, यांच्यापर्यंत कोरोना पोहोचणार नाही, यासाठी नेमकी कोणती काळजी घेता येईल, याकडे लक्ष देणं निश्चितच गरजेचं आहे.