कोरोनाचा नववर्षाच्या स्वागत यात्रेला फटका,२१ वर्षांनंतर स्वागतयात्रांना ब्रेक

तब्बल २१ वर्षांनंतर स्वागतयात्रांना ब्रेक 

Updated: Mar 13, 2020, 08:23 PM IST
कोरोनाचा नववर्षाच्या स्वागत यात्रेला फटका,२१ वर्षांनंतर स्वागतयात्रांना ब्रेक title=

डोंबिवली : डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातल्या गुडीपाडवा स्वागतयात्रा यावर्षी होणार नाहीत. तब्बल २१ वर्षांनंतर स्वागतयात्रांना ब्रेक लागला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे सरकारचे आदेश आहेत.

धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन सरकारने केलंय. त्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतयात्रा आयोजकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. डोंबिवलीतल्या गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ही माहिती दिलीय.

राज्यात १७ रुग्ण 

पुण्यात आज एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर गेली असून राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता १७ वर गेली आहे. आज नागपुरात २ आणि पुण्यात १ कोरोना रुग्ण आढळला. राज्यात आज कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. काही रुग्ण परस्पर माध्यमांशी संपर्क करत आहेत. माध्यमांनी देखील अफवांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.