मुंबई : देशभरात 'लव जिहाद' हा कायमच मोठा मुद्दा राहिला आहे. या मुद्यावरून होणारा वाद काही नवीन नाही. 'लव जिहाद'वरून राजकारण तापलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बिहारचे मुख्यमंत्री याबद्दल कोणता कायदा लागू करतात याकडे आमचं लक्ष आहे असं वक्तव्य केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बिहारमध्ये बनवलेल्या कायद्याचा आणि अन्य राज्यातील कायद्याचा अभ्यास करू त्यानंतर काय तो निर्णय घेवू असं देखील ते म्हणाले. शिवाय 'लव जिहाद'वरून राजकारण होत आहे. त्यामुळे याविषयावर आम्ही अभ्यास करू.
त्याचप्रमाणे, राज्य भाजपनेते राजकारण करत आहेत अशी टीका करत ते म्हणाले, महाराष्ट्राला येत्या तीन वर्षात विकासाच्या टोकावर नेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. परंतु भाजप नेते पातळी सोडून राजकारण करत आहेत असं देखील राऊत म्हणाले. देशाची परिस्थिती गंभीर आहे, तरी देखील भाजप नेते राजकारण करत आहे. ते पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सल्ल्याकडे देखील दुर्लक्ष करत असल्याचं सांगत त्यांनी भाजप नेत्यावर निशाणा साधला
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला काय संबोधित करत आहेत ते संपूर्ण देशाला समजत आहे. परंतू भाजप नेत्यांना नाही. कोरोनामुळे देशावर मोठं संकट आलं आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आली होती. आता देखील तिच स्थिती आहे. जनतेला खाण्यासाठी अन्न नाही आणि भजप नेते पातळी सोडून राजकारण करत असल्याची टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.