Sanjay Raut यांनी 55 लाख भरले म्हणजेच गुन्हा कबुल केला होता - किरीट सोमय्या

ED seized Sanjay Raut property : ईडीच्या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Updated: Apr 5, 2022, 02:55 PM IST
Sanjay Raut यांनी 55 लाख भरले म्हणजेच गुन्हा कबुल केला होता - किरीट सोमय्या title=

ED seized Sanjay Raut property​ : संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबागमधील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 'आम्ही तक्रार करताना पुरावे देतो. 55 लाख त्यांनी भरले होते. तेव्हा मी ईडीला सांगितलं होतं की, म्हणजे यांनी गुन्हा कबुल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की,

'संजय राऊत यांची करोडोंची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ज्यामध्ये दादरमधील फ्लॅट आहे. संजय राऊत यांचे मित्र आणि आर्थिक पार्टनर प्रवीन राऊत यांनी घोटाळा केला. फक्त संपत्ती जप्त करुन चालणार नाही. याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ही संजय राऊतांना विचारलं का नाही की 55 लाखांची जमीन का दिली. प्रवीन राऊत भ्रष्ट आहेत आणि त्यांचं पार्टरन संजय राऊत आहेत.'

'मला असे वाटत की संजय राऊत यांना चाहूल लागली होती, म्हणून गेले काही दिवस यांची नौटंकी सुरू होती. त्यावर आज पडदा पडला आहे.'

'हसन मुश्रीफ प्रकरणात देखील जेव्हा ईडी तपास करणार तेव्हा देखील भरपूर काही बाहेर येणार. गृहमंत्री वळसे-पाटील बेजबाबदारपणे वक्तव्य करतात.'

'संजय राऊत यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का ईडीने? जे सांगायचे ते ईडीला सांगा की. '

'मुख्यमंत्री यांनी जाब विचारला पाहिजे होता. या प्रकरणात गृहमंत्री यांनी माहिती घेतली पाहिजे.'

'मागील दोन महिन्यापासून ते ज्या पद्धतीने आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजु शकतो. यांना वाटत पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू पण कारवाई होणार'