नवी दिल्ली : शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीकडून संजय राऊत यांचे अलिबागमधील आठ प्लॉट आणि दादरमधील राहत्या घरावर जप्तीची कारवाई करण्यात आील आहे.
ईडीच्या कारवाईवर संजय राऊत यानी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय सूड आणि बदला कोणत्या थराला जाऊन कारवाया होतात हे पाहिला मिळतंय. आमचं राहातं घर जप्त केलंय भाजपचे लोकं आनंदाने उड्या मारतायत, फटाके वाजवतायत, मराठी माणसाचा एक हक्काचा फ्लॅट जप्त केल्याने त्यांना आनंद झालाय असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
2009 मध्ये आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली जागा आणि घर त्याची साधी आमच्याकडे कुणी चौकशी केली नाही, विचारणा केली नाही.
एक रुपया जरी मनीलॉन्ड्रींग प्रकरणातला पैसा आमच्या खात्यात आला असेल तर सर्व प्रॉपर्टी आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.
एक एकरही जागा नाही, आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांनी अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत. आता ईडी मनीलॉन्ड्रींग दिसायला लागलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
कारवाई केली आहे, यातून पेरणा मिळते लढण्याची असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.