दोन पक्षांतील लढाई दुरून पाहण्यातही मजा आहे - संजय राऊत

गुजरात निवडणुकीबाबत शिवसेनेनं प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केलीय... राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष शिवसेना गुजरात निवडणुकीत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागलं होतं.

Updated: Oct 26, 2017, 04:58 PM IST
दोन पक्षांतील लढाई दुरून पाहण्यातही मजा आहे - संजय राऊत title=

मुंबई : गुजरात निवडणुकीबाबत शिवसेनेनं प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केलीय... राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष शिवसेना गुजरात निवडणुकीत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागलं होतं.

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्य असल्यामुळे त्यांना अपशकून करू नये, अशी भावना असल्याचं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

आपलं भाजपाशी वैयक्तिक भांडण नाही, तर वैचारिक लढा असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. गुजरातमध्ये सर्व भाजप विरोधक एकवटले तरी त्यात शिवसेना नसेल, अशी पुष्टीही राऊतांनी जोडलीय. आमचा पक्ष काँग्रेसमध्ये जाणारा नाही... प्रखर हिंदुत्ववादी आणि भूमिका असणारा आमचा पक्ष आहे, असंही राऊतांनी म्हटलंय. 

मात्र भाजपाला पाठिंबा देण्याबाबत त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही. दोन पक्षांमध्ये सरळ लढाई होणार असेल तर दुरून लढाईचा निर्णय काय लागतोय, हे पाहण्यातही मजा असते, असं राऊत यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हटलंय राऊतांनी... ऐकुयात त्यांच्याच तोंडून...