संजय राऊत ED च्या ताब्यात! सकाळपासून काय काय घडलं पाहा

शिवसेना खासदार संजय राऊत ED च्या ताब्यात! सकाळपासून काय काय घडलं पाहा एका क्लीकवर

Updated: Jul 31, 2022, 07:38 PM IST
संजय राऊत ED च्या ताब्यात! सकाळपासून काय काय घडलं पाहा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची आज सकाळपासून चौकशी सुरू होती. तब्बल 9.30 तास ही चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आलं. संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांची मुलगी देखील पोहोचली आहे.  सकाळपासून ते संजय राऊत ईडी कार्यालयात पोहोचेपर्यंत नेमकं काय घडलं जाणून घेऊया. 

याआधी संजय राऊत यांना ED कडून चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावण्यात आला होता. मात्र संजय राऊत हजर राहिले नव्हते. त्यामुळे आज सकाळी ED अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले. 

सकाळपासून नेमकं काय-काय घडलं? 
सकाळी 7.34 मिनिटांनी संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. ईडीची टीम राऊतांच्या घरी पोहोचल्यानंतर राऊत समर्थक त्यांच्या बंगल्याबाहेर गोळा झाले. 

सकाळी 8.20 वाजता संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत खिडकीत आले. शिवसैनिक आणि राऊत समर्थकांनी दुपारच्या सुमारास घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर संजय राऊत यांनी सकाळी 8.46 दरम्यान शिवसेना सोडणार नाही असं ट्वीट केलं. एकामागे एक चार ट्वीट त्यांनी केले. 

त्यानंतर 9.30 वाजल्यापासून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या सगळ्यामध्ये संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून चौकशी सुरू होतीच. 10.28 च्या सुमारास संजय राऊत यांचे वकील त्यांच्या पोहोचले. 

सकाळी 11.10 च्या सुमारास संजय राऊत खिडकीत आले त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. 

11.15 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर नाही त्याला डर कशाला म्हणत पहिली प्रतिक्रिया दिली.

दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली.

3.45- सुमारास संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्याचवेळी बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केली. याच गोंधळात संजय राऊत यांना बाहेर आणण्यात आलं. संजय राऊत यांनी त्यावेळी भगवा उपर्ण घेऊन शिवसैनिकांना अभिवादन केलं. 

4. 54 च्या सुमारास त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी निघाले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात फोर्ट इथल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं. 
5.30- संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल तर कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली. 
5.48- संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, 'महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. खोटे कागदपत्र, पुरावे गोळा करून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र मी झुकणार नाही, तर लढत राहणार अशी कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. 
5.52- संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्र ईडी कार्यलयात आणली. 
5.57 - संजय राऊत यांची मुलगी ईडी कार्यालयाबाहेर आली.
6.32- संजय राऊत यांचे वकील आले