Viral Video : मुंबईतील नरिमन पॉइंटवर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा अनेक लोक आपल्या कलेचे प्रदर्शन करताना दिसले असतील. सोशल मीडियावरही आपणे असे अनेक सिक्रेट सुपरस्टार पाहतो. कोणी आपल्या नृत्याने तर कोणी आपल्या गाण्याने आपल्याला वेड लावतात. सोशल मीडियावर अप्रतिम गाणी आणि डान्सचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. यांमधील हे कला पाहून आपण अवाक होऊ जातो. सध्या सोशल मीडियावर असाच एक मुंबईतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबईतील नरिमन पॉइंटवर लोक फिरायला येतात. त्यांचा सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सदैव तैनात असतात. या व्हिडीओमधील सिक्रेट सुपरस्टार दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या मुंबई वाहतूक पोलिसांचा जवान आहे. या पोलिसाचं गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजूबाजूला असेली लोक पण या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
धरम पाजी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र याचं प्रसिद्ध गाणं या पोलिसांनी गाण्याला सुरुवात केल्यावर इथे असलेले लोकांचे पाय थिरकायला लागले. या पोलिसाने पोलीसगिरी सोडून 'मैं जट यमला पगला दीवाना' हे गाणं म्हणायला घेतल्यावर या परिसरातील वातावरण संगीतमय झालं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकतात की, या व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकतात की, लहान मुलांपासून तरुणीमंडळींसोबत अगदी वृद्ध व्यक्तीही नाचायला लागतात. या व्हिडीओ तुम्ही पाहिल्यावर लक्षात येईल एक लाल कुर्ता घातलेला म्हातारा त्याचा अप्रतिम शैलीने सगळ्याचे लक्ष वेधन घेतो. पोलीस काकाच्या गाण्यावर हा यंग म्हातारा सगळ्यांना फ्लाइंग किस करतना मस्त डोलताना दिसतो.
हा मन जिंकणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर indianmusicsouls नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत त्याला 45 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.