शिवसेना संकटात : आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही, संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता त्यांच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठे वादळ उठले आहे. 

Updated: Jul 19, 2022, 11:47 AM IST
शिवसेना संकटात : आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही, संजय राऊत यांचा दावा title=

मुंबई : Maharashtra Politics: Sanjay Raut has once again targeted the BJP and the Eknath Shinde government : महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता त्यांच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठे वादळ उठले आहे. महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने शिवसेना खासदारांना Y दर्जाची सुविधा पुरविल्यानंतर राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे अनेक खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याच्या विनंतीसह पत्र सादर करण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत काव्यात्मक शैलीत टीका करताना दिसत आहेत. त्यांनी एक कविता ट्विट केली आहे. फन कुचलने का हूनर भीं सिखिए.. सांप के खौफ से जंगल नहीं
छोडा करते... जय महाराष्ट्र!!' 

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला असून महाराष्ट्रातील खासदारांच्या घरी पोलीस तैनात करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. पोलीस बळाचा वापर केला जात आहे. राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही पक्षाच्या चिन्हासाठी लढण्यास तयार आहोत. भाजप महाराष्ट्राचे तीन तुकडे करणार आहे आणि त्याआधी शिवसेनेच्या पाठीत वार केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, हा फोटो व्हायरल होत आहे, पण त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. तो फोटो का व्हायरल होत नाही?, असा सवाल उपस्थित केला.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले असून ते बंडखोर खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे खासदार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होऊ शकते.

30 जून रोजी नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व मंत्रालयांचे काम पाहत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात या आठवड्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. याआधी शिंदे आणि फडणवीस शपथ घेतल्यानंतर दिल्लीला गेले होते. दोन्ही नेत्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांची भेटी घेतल्या होत्या.