निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला - उद्धव ठाकरे

संजय राठोड (Sanjay Rathod) याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी ( inquiry) राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. 

Updated: Feb 28, 2021, 07:52 PM IST
निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला - उद्धव ठाकरे  title=

मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod) याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी ( inquiry) राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. दोषी असल्यास कारवाई होणारच, ही सरकारची भूमिका कायम आहे, असे त्यांनी यावेळी संजय राठोड प्रकरणावर भाष्य केले आहे. आपण राठोड यांचा राजीनामा घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Sanjay Rathod resigns for impartial inquiry - CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत सरकारची भूमिका स्पष्ट केली. आमची जबाबदारी न्यायाने वागण्याची आहे. या प्रकरणात तपास झाला पाहिजे, तो निष्पक्ष झाला पाहिजे. कोणीही असो शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आहे. पुण्यातील नातेवाईक दावा करत आहेत. ते आमचे नातेवाईक नाहीत, असे पुजाच्या आई-वडिलांना सांगितले, असे ते यावेळी म्हणाले.

गेल्या आठवड्यात आणखी एक आत्महत्या मुंबईत झाली त्याची कोण चर्चा करत नाही. त्या आत्महत्येत सुसाईड नोट आहे, त्यात काही बड्या नेत्यांची नावे आहेत. भाजपच्या नेत्याचं नाव असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा परवाना भाजपच्या नेत्यांनी दिला आहे का, असा सवाल भाजपला मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारला.

संजय राठोड प्रकरणी पोहरा येथे ज्यांनी शक्तिप्रदर्शन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, संजय राठोड यांनी येऊ नका सांगितले होते. संजय राठोड यांनी आज राजीनामा दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पूजा चव्हाण प्रकरणातून संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवल्याने राजीनामा द्यावा लागला.

राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राठोड यांनी माध्यमांसमोर येत राजीनामा देण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या तीस वर्षात सामाजिक, राजकीय क्षेत्रात मी जे काम केले आहे, ते उद्ध्वस्त करण्याचे काम झाले आहे. मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. बदनामी करून, घाणेरडं राजकारण केले गेले, असा थेट आरोप भाजपवर संजय राठोड यांनी केला आहे.