कोरोनात चांगले काम, विरोधकांकडून कोरोना योद्धांचा अपमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भ्रष्टाचाचा आरोप करुन तुम्ही कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. दुतोंडी विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

Updated: Feb 28, 2021, 07:29 PM IST
कोरोनात चांगले काम, विरोधकांकडून कोरोना योद्धांचा अपमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनात (Coronavirus) भ्रष्टाचार झाला असे विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केला, याबाबत मला किव करावी वाटते. राज्य सरकारने या काळात चांगले काम केले आहे. गेल्यावर्षी याच सुमारास, अधिवेशन सुरू असतानाचा कोविड-१९ने (Covid-19) आपल्या राज्यात प्रवेश केला. कोरोनाचा पुन्हा धोका आता वाढताना दिसत आहे. धारावी पॅुर्टनचे कौतुक जगभर झाले. असे असताना भ्रष्टाचाचा आरोप करुन तुम्ही कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. (Corona Warriors insulted by the Opposition) दुतोंडी विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनातील कामकाजाबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षावर हल्लाबोल चढवला. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी याचा आधी त्यांना अभ्यास करावा. जयंती की पुण्यतिथी माहित नाही आणि टीका करत आहेत. मागच्या काळात इथे आणि केंद्रात त्यांचे सरकार होते तेव्हा सीमाप्रश्न का सोडवला नाही? त्यांनी मला एक फुकटचा सल्ला दिला आहे. मात्र, जीएसटीची 36 हजार कोटी रुपये येणं बाकी आहे. डिझेल, पेट्रोल दरवाढीवर का बोलत नाही. पेट्रोलची सेंच्युरी आम्ही पहिल्यांदा अनुभवत आहोत. आताची पेट्रोलची भाववाढीमुळे त्यांच्या तुंबड्या भरणार आहेत, असा प्रतिटोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.

कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागले. आम्ही विनासायास कर्जमुक्ती केली. थापा मारायच्या त्या जोरात मारायच्या, पण जोरात बोललं की खरं नसतं, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जीएसटीचे 29 हजार कोटी येणं बाकी आहे. अतिवृष्टीचे 4 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.