राज्यात जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन

राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2018, 08:41 AM IST
राज्यात जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन title=

मुंबई : राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. 

अस्मिता - माझा गौरव, माझा हक्क

राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ८ मार्च महिला दिनापासून या योजनेची सुरवात होईल. या योजनेला अस्मिता - माझा गौरव, माझा हक्क असं नाव देण्यात आलं. 

लोगोचे अनावरण

या योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.