अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी - संदीप देशपांडे

मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात एकच गोंधळ उडाला आहे. 

Updated: Oct 13, 2017, 05:26 PM IST
अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी - संदीप देशपांडे title=

मुंबई : मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात एकच गोंधळ उडाला आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आमच्या नगरसेवकांना कशाचं प्रलोभन दिलंय हे तपासावं लागेल. तसेच त्यांना धमक्या दिल्या का? तेही बघावं लागेल. याप्रकरणी आमच्या नेत्यांनी कायदेशीर तक्रार केली आहे. हे सर्व नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनावर निवडून आले आहे. अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी आहे. त्यांना जायचं होतंच तर पक्षाचा, पदाचा राजीनामा द्यायचा होता. निवडणूक लढायची होती’. 

शिवसेनेकडून नगरसेवक खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रच भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. त्यातच मनसेचे काही नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.