Corona Vaccination : बोगस लसीकरण प्रमाणपत्राचा 'धारावी पॅटर्न'

दोनही लस घेतल्याचं बोगस लसीकरण प्रमाणपत्र अशी पद्धतीने होत होती सर्रास विक्री

Updated: Jan 7, 2022, 04:55 PM IST
Corona Vaccination : बोगस लसीकरण प्रमाणपत्राचा 'धारावी पॅटर्न' title=

मुंबई : मुंबईत कोरोनाचा  (Coronavirus) धोका दिवसागणिक वाढत आहे.  पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका पुन्हा वाढला आहे. (The number of corona positives in Dharavi is increasing.)

मुंबई पालिकेचे जी उत्तर विभागाचे  सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी माहिती देताना सांगितले की, धारावीची चिंता नक्कीच वाढली आहे. दाटीवाटीचा भाग आहे.  तसेच परराज्यातून येणारे ही नागरिक खूप आहेत. अनेकांनी अद्याप पहिलाच डोस घेतला नाही. याचाच फायदा घेत धारावीत बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणारं रॅकेट सक्रिय झालं आहे. 

अवघ्या काही रुपयांमध्ये लोकांना दोन्ही लस घेतल्याचं बोगस प्रमाणपत्र दिलं जात आहे. धक्कादायक म्हणजे बोगस प्रमाणपत्राची नोंदणी अधिकृत कोविन अॅपवरसुद्धा दिसत होतं, त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडे बोगस प्रमाणपत्र दिलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सेकारन फ्रान्सिस नाडर असं या सायबर कॅफे मालकाचं नाव आहे. पोलिसांनी आधी बनावट ग्राहकाला त्याच्याकडे पाठवून त्याला जाळ्यात अडकवलं. नाडरने या ग्राहकाला बोगस प्रमाणपत्र बनवून दिलं. विशेष म्हणजे हा ग्राहक मुंबईत असूनही त्याचं बिहारमध्ये लसीकरण झाल्याची नोंद या प्रमाणपत्रावर करण्यात आली होती. 

यानंतर पोलिसांनी धाड टाकत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे आतापर्यंत ४ बोगस प्रमाणपत्र आढळून आली आहेत. तसंच लॅपटॉप आणि प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे. 

धक्कादायक म्हणजे एवघ्या एक हजार रुपयात संपूर्ण लसीकरणाचं बोगस प्रमाणपत्राची सर्रास विक्री केली जात होती. बिहारमध्ये लसीकरण झाल्याची यावर नोंद करण्यात आली आहे.