अमृता फडणवीस यांची विद्या चव्हाणांना मानहानीची नोटीस

काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?

Updated: Jan 7, 2022, 04:17 PM IST
अमृता फडणवीस यांची विद्या चव्हाणांना मानहानीची नोटीस title=

मुंबई : भाजप पदाधिकारी आणि सोशल मीडिया प्रमुख जीतेन गजारीया यानी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे काल मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांना ताब्यात घेतले होते. यावरून भाजपवर टीका होऊ लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण आमदार यांनी या वादात माजी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्या पत्नी अमृता याना ओढले. यावरून अमृता फडणवीस यांनी चव्हाण यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे.

विद्या चव्हाण यांनी रश्मी ठाकरे यांची प्रतिमा वाईट नाही. मात्र, फडणवीस यांच्या पत्नीने काय गुण उधळले होते? त्यानां मुख्यमंत्री केले असते तर त्यांची प्रतिमा नुसतीच डान्सिंग डॉल अशीच झाली असती.

दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोची तुलना करताना तुमच्या पूर्वीच्या मुख्यमंत्री यांच्या बायकोने काय गुण  उधळले ते ट्विट केले तर बरं होईल असा टोला लगावला होता. 

यावर अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या सुनेच्या प्रकरणाचा संदर्भ देत विद्याहीन म्हणत मानहानीची नोटीस पाठविली आहे. तसेच, अमृता यांनी ट्विट करून आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,ती आहे नेता विद्याहीन चव्हाण अशी टीका केली आहे.

आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण, मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! असेही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.