साध्वी प्रज्ञा मूर्ख, 'त्या' भाजपमध्ये असणे दुर्दैव- मधू चव्हाण

साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Feb 1, 2020, 09:18 AM IST
साध्वी प्रज्ञा मूर्ख, 'त्या' भाजपमध्ये असणे दुर्दैव- मधू चव्हाण title=

मुंबई: साध्वी प्रज्ञा या मूर्ख आहेत. त्या भाजपमध्ये असणे, हे पक्षाचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते मधू चव्हाण यांनी व्यक्त केली. ते शुक्रवारी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या माजी नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी साध्वी प्रज्ञा यांच्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना मधू चव्हाण यांनी म्हटले की, साध्वी प्रज्ञा यांना मूर्ख म्हटले. 

साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. नथुराम गोडसे महान असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरून बराच वादंगही निर्माण झाला होता. 

नथुराम गोडसे देशभक्त, साध्वी प्रज्ञा पुन्हा वादात

या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपवर टीका केली. पुण्यातील CAA विरोधातल्या सभेत उर्मिला मातोंडकर यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी हिंदूच असल्याचे म्हटले होते. मधू चव्हाण यांनी याचा प्रतिवाद करताना गुन्हा करणाऱ्याला धर्म नसतो, असे म्हटले होते. ती गोष्ट चूकच होती, असे चव्हाण यांनी म्हटले. यावर साध्वी प्रज्ञा नथुरामला देशभक्त म्हणतात त्याचे काय, असा सवाल मधू चव्हाण यांना विचारण्यात आला. 

साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात झटकले, जाहीर माफी मागण्याचे आदेश

त्यावेळी मधू चव्हाण यांनी म्हटले की, त्या साध्वी मूर्ख आहेत, त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचे दुर्दैव आहे. चव्हाण यांनी स्वत:च्याच पक्षाच्या खासदारावर टीका केल्याने पक्षात त्याचे पडसाद उमटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.