सदाभाऊ खोत यांची भाजपाकडे १० जागांची मागणी

विधिमंडळ अधिवेशनाची सांगता झाली असतांना विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. 

Updated: Jul 3, 2019, 06:41 PM IST
सदाभाऊ खोत यांची भाजपाकडे १० जागांची मागणी title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाची सांगता झाली असतांना विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने 10 विधानसभा जागांची भाजपाकडे केली आहे. संघटनेची अनेक ठिकाणी पायामुळं घट्ट असल्याने ही मागणी रास्त असल्याची प्रतिक्रिया खोत यांनी दिली आहे.

इस्लामपूर, शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर, माण, कोरेगाव, फलटण, नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ नाशिकमशील सटाणा आणि विदर्भमधील चिखली अशा 10 मतदारसंघावर सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे. 
 
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप - सेना 135 जागा लढवणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर 18 जागा मित्रपक्षांना देण्याचे भाजपाने याआधीच जाहीर केलं आहे. भाजपबरोबर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आठवले यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे मित्र पक्ष आहेत. 

तेव्हा 18 जागांमध्ये 10 जागांची मागणी सदाभाऊ खोत यांनी केल्याने भाजपापुढे मित्रपक्षांच्या जागावाटपाची डोकेदुखी यापुढच्या काळांत नक्कीच वाढणार आहे.