मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीसांचं कौतुक केलंय. तर भाजपाला कानपिचक्या देत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड मत व्यक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची गंगा ज्या दिशेने वाहत आहे त्याच मार्गाने ही रथयात्रा पुढे जाणार. काही ठिकाणी दलदल, काही ठिकाणी भेगाळलेली जमीन, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे सुकलेले चेहरे दिसतील. हे सगळे ठीक करून पुढे जा. रथाची चाके कुठे अडकू नयेत म्हणून यासाठी शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री आमचेच आहेत, ते उत्तम नेतृत्व करीत आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत म्हणून काळजीने हे सांगितले. लालकृष्ण आडवाणी यांच्या अयोध्या रथयात्रेस पंचवीस वर्षे उलटून गेली, पण राम वनवासातच आहे. आमचे अयोध्येत जाणे-येणे सुरू आहे व राममंदिर होईल ही आशा जिवंत आहे. कारण जेथे तुम्ही कमी पडाल तेथे आम्ही खांद्याला खांदा भिडवून उभे राहू! तेव्हा रथ पुढे जाऊ द्या, असे म्हटले आहे.
राज्याच्या विकासाची गंगा ज्या दिशेने वाहत आहे त्याच मार्गाने ही रथयात्रा पुढे जाणार. मुख्यमंत्री आमचेच आहेत, ते उत्तम नेतृत्व करीत आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत म्हणून काळजीने हे सांगितले. लालकृष्ण आडवाणी यांच्या अयोध्या रथयात्रेस पंचवीस वर्षे उलटून गेली, पण राम वनवासातच आहे. आमचे अयोध्येत जाणे–येणे सुरू आहे व राममंदिर होईल ही आशा जिवंत आहे. कारण जेथे तुम्ही कमी पडाल तेथे आम्ही खांद्याला खांदा भिडवून उभे राहू! तेव्हा रथ पुढे जाऊ द्या, असे सांगताना चिमटा काढला आहे.