Mumbai Crime News : मुंबईत घडलेल्या (Mumbai) एका धक्कादायक प्रकरणामध्ये सलमानचं नाव समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी सलमानला मध्यरात्री फोन केला आणि त्याचा संपूर्ण बेतच फसला. मुख्य म्हणजे त्याचे वाईट मनसुबे यशस्वी झाले नाहीत आणि एका तरुणीची या विळख्यातून सुटकाही झाली.
अंबोली (Amboli police) पोलिसांनी कारवाई करत सलमान कुरेशी नावाच्या 30 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. 26 नोव्हेंबरला दुपारी जवळपास 4 वाजण्याच्या सुमारास सलमान मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्याचवेळी 15 वर्षीय तरुणी आणि तिची मैत्रीण (नावाची गोपनीयता ठेवण्यात आली आहे.) शिकवणीहून परतीच्या वाटेला लागली होती. त्याचवेळी सलमान कारमध्ये होता.
कारमधूनच त्यानं या तरुणीकडे नजर रोखत इशारा केला आणि तो कावेबाजपणे हसला. हा विचित्र प्रकार पाहून तरुणींनी त्या ठिकाणहून निघत रिक्षानं घराची वाट धरली. सलमान इतक्यावरच थांबला नव्हता. (roadside romeo gets punished at midnight by police in Latest Marathi news)
सलमान इतक्यावरच थांबला नव्हता. त्यानं या तरुणीचा पाठलाग करणं सुरुच ठेवलं होतं. त्याचं धाडस इतपत वाढलं की एके ठिकाणी रस्त्यात रिक्षा थांबलेली असताना संधी साधत त्यानं एक चिठ्ठी तिच्याकडे दिली. यामध्ये आपला फोन नंबर असल्याचं त्यानं तिला सांगितलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून आपल्यापासून घडणारा हा सर्व प्रकार अखेर या तरुणीनं तिच्या वडिलांच्या कानावर घातला आणि त्यांनी तातडीनं पोलिसांत धाव घेतली. तो तरुणीच्या फोनची वाट पाहत राहिला आणि मध्यरात्री त्याला थेट पोलिसांचाच फोन गेला आणि पोलीस कोठडीची वाट धरावी लागली.
विनयभंग आणि पोक्सो कलमांअंतर्गत सलमानवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये सलमानसह त्याच्या मित्राचंही नालव समोर आलं. ज्यानंतर पोलिसांनी त्याचाही शोध घेण्याचं काम हाती घेतलं.