'रिपब्लिक'च्या सुरक्षारक्षकांनी रिपोर्टिंग कराणाऱ्या पत्रकारांना रोखले

रिपब्लिक चॅनेलचे नाव खोट्या टीआरपी रॅकेटमध्ये आल्यानंतर रिपब्लिकच्या ऑफिसबाहेर रिपोर्टिंग करायला गेलेल्या पत्रकारांना रिपब्लिकच्या सुरक्षारक्षकांनी रोखले. 

Updated: Oct 8, 2020, 10:02 PM IST
'रिपब्लिक'च्या सुरक्षारक्षकांनी रिपोर्टिंग कराणाऱ्या पत्रकारांना रोखले  title=

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे नाव खोट्या टीआरपी रॅकेटमध्ये आल्यानंतर रिपब्लिकच्या ऑफिसबाहेर रिपोर्टिंग करायला गेलेल्या पत्रकारांना रिपब्लिकच्या सुरक्षारक्षकांनी रोखले. 'झी न्यूज'च्या महिला पत्रकाराला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सुरक्षारक्षकांनी मुजोरी केली. यावेळी धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रिपब्लिकच्या ऑफिसबाहेर रिपब्लिकच्या सुरक्षारक्षकांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही येथे येऊ शकत नाही, असे म्हणत कॅमेरामनला अडविण्याचा प्रयत्न केला. 'झी न्यूज'ने दोन्ही भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकच्या सुरक्षारक्षकांनी केले.

खोट्या TRPचे रॅकेट उघड; दोघांना अटक 

दरम्यान, मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन क्षेत्रातील खोट्या टीआरपीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं केलेल्या तपासात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा हे दोन मनोरंजन चॅनल आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीचं नाव समोर आले आहे. बार्क या संस्थेने हंसा एजन्सीला टीआरपीचे आकडे गोळा करण्याचं काम दिले आहे. 

या संस्थेच्या काही कर्मचारी आणि चॅनल्सच्या लोकांनी मिळून टीआरपीचे आकडे मनमानी पद्धतीनं वाढवल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकरा परिषद घेऊन सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी फक्त मराठी आणि बॉक्स मराठी या दोन चॅनलच्या मालकांना अटक केली. 

तर रिपब्लिक टीव्हीच्याही प्रमोटर आणि डायरेक्टर, तसंच यात सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सोबतच दोषी चॅनेलची बँक खाती तपासली जातील आणि त्यात काही गैरव्यवहार आढळल्यास ती सील केली जातील अशी माहितीही मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली आहे.