मोठी बातमी, आंदोलनापूर्वी शरद पवार यांच्या घरची रेकी केली - सूत्र

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याच मोठा कट, CCTV तून समोर  

Updated: Apr 9, 2022, 06:49 PM IST
मोठी बातमी, आंदोलनापूर्वी शरद पवार यांच्या घरची रेकी केली - सूत्र title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरु केला आहे. 

पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदोलन करण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भागात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यातून पोलिसांच्या हातात ही माहिती लागली आहे. 

अटक करण्यात आलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले असून यातूनही पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती हाती लागली आहे. 

शरद पवार यांच्या घराजवळ केलेलं आंदोलन हा मोठा कट होता असं पोलिसांचं म्हणणं आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शरद पवार यांच्या घराजवळचे आणि आझाद मैदानातील सीसीटीव्ही कॅमराचं फुटेज तपासलं आहे. 

शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन
न्यायालयाच्या निर्णयानंतर काल आझाद मैदानात जल्लोष करणारे एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक झाले. या आक्रमक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP CHIEF SHARAD PAWAR ) यांच्या 'सिल्वर ओक' ( Silver Oak ) या निवासस्थानी गराडा घातला आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

एसटी विलीनीकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडथळा आणला, असा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी  आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेकही केली.