मुंबई : मुंबई, पुणे महानगर मध्ये रेड झोनमध्ये स्टँड अलोन दुकांनाना उद्यापासून परवानगी ( म्हणजे मॉल वगळता ) सिंगल शॉप दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे.
स्टँड अलोनमध्ये एका लाईनमध्ये पाच पेक्षा जास्त दुकांनाना परवानगी नाही.
खाजगी बांधकामे करण्यास उद्यापासून परवानगी देण्यात आली आहे.
कॉन्टेंमेंट विभागामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर दुकानांना परवानगी नसणार आहे.
रेड झोनमध्ये सलूनला परवानगी नसली तरी खाजगी बांधकाम करायला परवानगी असल्याचे सांगण्यात आले आहे.
जरी नोंदणी केलेल्या मजदूर /कामगार / परप्रांतीयांना सरकारच्या परवानगीने रेल्वेने दुसऱ्या राज्यात नेले जात आहे. असे असले तरी महाराष्ट्रात दोन जिल्ह्यांमध्ये प्रवासाला ( कुठलाही झोन असला ) तरी अजूनही परवानगी देण्यात आली नाही. हे जिल्हा बंदीचे आदेश कायम असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका वगळून रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील खासगी कार्यालये ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा लागणार आहे.
मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका वगळून इतर ठिकाणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील सरकारी कार्यालयात उप सचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती असणार आहे. तर त्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३३ टक्के उपस्थिती अपेक्षित आहे.