मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणायला सुरूवात केली आहे. जांभळ्या रंगाच्या १०० रूपयाच्या नोटा, काही ठिकाणी ATM वर मधून चलनात येत आहेत. दरम्यान चर्चा आहे की, आरबीआय १०० रूपयांच्या नव्या नोटा देखील लवकरच बदलणार आहे. कारण यापुढची नवी १०० रूपयांची नोट फार टिकाऊ असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत, तुमच्या खिशातील आता सध्या असलेल्या नोटा देखील बदललेल्या असतील. हो, २००, ५०० आणि २ हजार रूपयांच्या नोटा आणखी एकदा बदलतील.
पण या नोटा बदलण्याचा अर्थ असा नसेल की, नोटाबंदी होईल. तर या जुन्या नोटा चलनात असताना, नव्या नोटा या नोटांची जागा चलनात घेतील, आणि बँकेमार्फत आरबीआय जुन्या नोटा चलनातून बाजूला करण्याचं काम करणार आहे. या बदल्यात चलनात येणाऱ्या नव्या नोटांना वॉर्निंश पेंट केल्यानंतर चलनात आणलं जाणार आहे. या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, किंवा नव्या नोटा कधी बदलल्या हे देखील लवकर कळणार नाही. नव्या रूपात नोटा येतात, त्या प्रमाणे या नोटा चलनात येतील.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नव्या नोटांना एक विशेष प्रकारचं वार्निश करणार आहे. यामुळे नोटांचं आयुष्य वाढणार आहे. यानंतर या नोटा चलनात उतरवणार आहे. आरबीआयचा वार्षिक अहवाल २०१७-२०१८ मध्ये जुन्या नोटा बदलवण्याचा प्रस्ताव होता. यात जुन्या नोटा बदलवण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.
खरंतर, हे फक्त प्रायोगिक तत्वावर हे होईल, असे प्रयोग जगभरातील अनेक देशांनी केले आहेत. याविषयी आरबीआयने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
१०० रूपयाच्या नोटेला देखील वॉर्निंश पेंट केलं जाणार आहे. आरबीआय १०० रूपयाच्या नोटेच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. १०० नंतर ५०० आणि २ हजार रूपयाच्या नोटेला देखील वॉर्निश केलं जाणार आहे.
सध्या असलेल्या नोटांपेक्षा वॉर्निश केलेल्या नोटा जास्त दिवस चालतील, हा त्यामागचा उद्देश आहे, तसेच या नोटेचं डिझाईन हे सध्या असलेल्या नोटांसारखं असणार आहे. या नोटा गांधीजींच्या सिरिजच्या असतील. फक्त या नोटांचं आयुष्य वाढावं, जास्तच जास्त वर्ष त्या खराब होवू नयेत, म्हणून या नोटांना वॉर्निंश पेंट केलं जाणार आहे.
वॉर्निशच्या नोटा आणण्याचा प्रस्ताव या आधी आरबीआयने आपल्या अजेंड्यात केला होता. आरबीआयचा वार्षिक अहवाल २०१६-२०१७ मध्ये चलन व्यवस्थापन चॅप्टरमध्ये याचा उल्लेख आहे. २०१७-१८ च्या अजेंड्यात हे प्रॉक्योरमेंट ऑफ करेंसी व्हेरिफिकेशन अॅण्ड प्रोसेसिंग सिस्टम (CVPS)/Shredding and Briquetting Systems (SBS) शिवाय नव्या सिरिजच्या बँक नोटा जारी करणे हा उद्देश आहे. तसेच वॉर्निशच्या बँक नोट चलनात आणण्याचा देखील उद्देश अजेंड्यात होता.
निवडणुकीआधी १००, ५०० आणि २ हजाराच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न आहे. पण यावर आरबीआयने अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार आरबीआयने याची तयारी करून ठेवली आहे.
निवडणुकीआधी नोटा का बदलणार? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे, पण निवडणुकीदरम्यान नोटांची कमतरता भासते. या दरम्यान एटीएम, बँकमध्ये देखील कॅश देखील कमी असते. नुकत्याच आलेल्या आरबीआयच्या एका रिपोर्टनुसार, मागील निवडणुकीत कॅशची कमतरता जाणवत होती. तसेच निवडणुकांआधी हा प्रयोग देखील यशस्वी झाला असेल.