सीकेपी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द

आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई

Updated: May 2, 2020, 11:28 PM IST
सीकेपी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द title=

मुंबई : मुंबईच्या सीकेपी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे. त्यामुळे यापुढे बँकेला कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाहीत. बँकेच्या दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एका प्रशासकाची नियुक्ती केली आहे. बँकेच्या खातेदारांना त्याच्यां खात्यात असणारी पाच लाखापर्यंतची रक्कम सरकारने सुरू केलेल्या विमा सुविधेमुळे मिळेल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. 

साधारण वर्षभरापूर्वी बँकेच्या वाढत्या बुडित कर्जाचा डोंगर लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं व्यवहारावर निर्बंध आणले होतेच. आता बँकेचा परवाना रद्द झाल्यानं दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे, तसंच बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा दुसऱ्या बँकेसोबत मर्जरसाठीचीही कोणतीही योजना नाही. बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी बँकेच्या प्रशासनाकडूनही बांधिलकी दिसत नाही. बँक त्यांच्या सध्याच्या आणि भविष्यातल्या गुंतवणुकदारांना पैसे देऊ शकत नाही, असं आरबीआयने सांगितलं आहे.