Ranjit Savarkar : रणजित सावरकरांना विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

रणजित सावरकरांना (Ranjit Savarkar) विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.  

Updated: Jul 6, 2022, 08:52 PM IST
Ranjit Savarkar : रणजित सावरकरांना विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता title=

मुंबई : रणजित सावरकरांना (Ranjit Savarkar) विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. रणजित सावरकर हे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचे नातू आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. स्वा. सावरकरांचा सन्मान करण्यासाठी आणि हिंदुत्व अधिक बळकट करण्यासाठी भाजप ही खेळी खेळत असल्याचं समजतंय. याला संघ आणि भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं मंजुरी दिली असून मुख्यमंत्र्यांनाही ही सूचना मान्य असल्याचं समजतंय. (ranjit savarkar name in the list of mla appointed by governor sources said)

कोण आहेत रणजित सावरकर  (Who Is Ranjit Savarkar)

रणजित सावरकर व्यवसायाने  इंजिनियर आहेत. रणजित यांनी सुरुवातीला महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधकपदावर काम केलं. रणजित यांचा आपद व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडिओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत महत्तवूर्ण योगदान होतं. 

रणजित यांनी सावरकरस्मारक डॉट कॉम ही वेबसाईट तयार केली. या वेबसाईटवर सावरकरांनी लिहिलेलं साहित्य उपलब्ध आहे. सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचारासाठी 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात त्यांची भाषणं ही लवकरच साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.