मुंबई : शिवाजी महाराज असते, तर राज्यसरकारला कडेलोटाची शिक्षा केली असती, अशी टीका आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केलीय.
धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जेजे रुग्णालात उपचार सुरू आहेत.
आज राजू शेट्टी आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धर्मा पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.
धर्मा पाटील यांच्यावर ही वेळ आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी शेट्टींनी यावेळी केली.
सरकारची भूमिका शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची आहे असं विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे धर्मा पाटील यांच्या जिल्ह्यातल्या सरकारमधल्या मंत्र्यांची कामं तातडीनं होतात. पण, पाटलांना मात्र जीव धोक्यात घालावा लागतो हे लाजिरवाणं असल्याचंही विखे यावेळी म्हणाले.